व्यक्तिमत्व बद्दल
अजिंक्य दिलीप बारणे
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सुरुवात सन् २०१२ संस्थेच्या माध्यमातुन वृक्षरोपन, संवर्धन व इतर पर्यावरण विषयक कामे केली. २०१५ साली छावा युवा संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी निवड झाली व त्याच्या माध्यमातुन शहरातील युवकांचे शैक्षणिक, नौकरी व इतर महत्तवाची प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. करत असलेल्या कामाची दखल घेत सन्माननीय आ. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांनी २०१७ साली प्रहार जनशक्ति पक्षाच्या पुणे जिल्हा युवा अध्यक्ष पदी निवड केली. सदर पक्षाच्या माध्यमातुन शैक्षणिक, कृषी, धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर विविध क्षेत्रात कामे करण्याची संधी पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात मिळाली.
विविध भागातील नागरीकांपर्यंत पोहचुन त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी मिळाली व त्यांना सोडवण्याचे प्रयत्न केले शेतकरी, विद्यार्थी, कामगार, रूग्ण, अनाथ, अपंग, विधवा व समाजातील इतर विविध घटकांची प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यामातून वेळोवेळी भ्रष्ट प्रशासना विरोधात विविध आंदोलन करण्यात आली पर्यावरण क्षेत्राच्या विषयी असलेली आवड व त्यानिमित केलेल्या कामाची पोचपावती म्हणुन २०१९ साली राष्ट्रीय हरित सेना पुणे जिल्हा अंमलबजावणी व सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलांना पर्यावरणा विषयक जनजागृती करण्याचे काम या समिती च्या माध्यमातुन केले. तसेच २०२१ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती च्या नामोनिर्देशित सदाय पदाचा बहुमान मिळवला. त्या माध्यमातुन शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणाची कामे करण्यात आली तसेच शहरातील होणाऱ्या वृक्षतोड विरोधात महत्तवाचे निर्णय घेण्याचे काम केले